Posts

आयवोमी इलेक्ट्रिक स्कूटरच्यावतीने ग्राहकांसाठी अनेक योजना 15 ऑगस्टच्या पहिल्या लकी सोडतीत

Image
 नगरमधील विकास वाघ यांना बक्षीस अहमदनगर : इलेक्ट्रिक स्कूटरमधील प्रथितयश असलेली भारतातील नामांकित कंपनी आयवोमीतर्फे ग्राहकांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील नुकत्याच झालेल्या पहिल्या भाग्यवान ग्राहक सोडतीत येथील विकास भाऊसाहेब वाघ यांना एका गाडीवर दुसरी गाडी (जीत-एक्स मॉडेल) तसेच दुसर्‍या एका ग्राहकास एक्स शो-रुम 100% कॅशबॅक योजनेचा लाभ मिळाला, अशी माहिती सुदोहा शोरुमचे संचालक श्री. नंदकुमार सुपेकर यांनी दिली. 15 ऑगस्ट रोजी सावेडी रस्त्यावरील सुदोहा सेल्स कॉर्पोरेशन या आयवोमी स्कूटर विक्री दालनात भाग्यवान विजेता सोडत काढण्यात आली. त्यात वरील भाग्यवान ग्राहकांना बक्षिसे मिळाली. या कंपनीच्यावतीने आता दुसरी सोडत येत्या 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्राहकांनी या सोडतीत सहभागी होण्यासाठी या दालनास जरूर भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक स्कूटर गाड्यांमध्ये आयवोमी कंपनी एक नामांकित असून या गाड्यांना ग्राहकांची प्रथम पसंती आहे. गेल्या सुमारे पाच वर्षांपासून या कंपनीचे सावेडीमध्ये दालन असून आतापर्यंत सुमारे 500 गाड्या ग्राहकांनी खरेदी केल्या असून या

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"

Image
  शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार" शालेय स्पर्धेवर होणार परीणाम, पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी ऑगष्ट मध्ये सुरु होत असलेल्या सर्व शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन - नियोजनास सहकार्य न करण्याचा एकमुखी निर्णय न्यू आर्टस कॉलेज, अहमदनगर येथे नगर, पारनेर व राहुरी तालुक्याच्या क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत घेण्यात आला.     शालेय स्पर्धा आयोजन नियोजना संदर्भात क्रीडा कार्यालयाकडून आज नगर येथे क्रीडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२२-२३ चा शालेय स्पर्धा आयोजनाचा न मिळालेला निधी,  खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्र न मिळणे, सिंथेटिक ट्रॅक नसल्याने खेळाडूंचे होत असलेले नुकसान, शालेय स्पर्धेत साहित्य व सुविधांची वानवा,  क्रीडा अनुदान प्रकरणे न मंजुर करणे, क्रीडा अनुदान वाटपात अपहार, तुटपुंजे पंच मानधन, निधी कपात, सुविधेच्या नावाखाली आकारली जाणारी ऑनलाईन कॉन्व्हेनीयन्स फी, ऑनलाईन मधील त्रुटी, क्रीडा स्पर्धेनंतर तालुका प्रमुखांना व शिक्षकांना मिळणारी वागणूक या संदर्भात शारीरिक शिक्षक व पदाधिकारी फारच आक्रमक झाले होते. मिटींगच्य

जय हिंद फाउंडेशनची आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दोनशे झाडांची लागवड

Image
  जय हिंद फाउंडेशनची आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दोनशे झाडांची लागवड विद्यार्थ्यांनी स्विकारली संवर्धनाची जबाबदारी  वृक्षांनी शाळेचा परिसर हिरवाईने फुलून विद्यार्थ्यांना सावली मिळणार -नूतन मिश्रा अहमदनगर - जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शहरातील आर्मी पब्लिक स्कूल येथे दोनशे झाडांची लागवड केली. पावसाळा सुरु झाला असताना फाऊंडेशनच्या वतीने माजी सैनिकांनी जिल्हाभर वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या पार्श्‍वभूमीवर वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. तर लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी शालेय विद्यार्थ्यांनी स्विकारली आहे. आर्मी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नूतन मिश्रा, निवृत्त कर्नल सर्जेराव नागरे, लेफ्टनंट कर्नल सोमेश्‍वर गायकवाड यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, रोहिदास पालवे, एकनाथ माने, सतीष पालवे, बाजीराव गोपाळघरे, दिनानाथ तांदळे, विनायक मोराळे, यश फाउंडेशनचे संजय डोंगरे, नवनाथ वारे, कौडेश्‍वर सैनिक फाउंडेशनचे अशोक मुठे, दादाभाऊ बोरकर, गणेश भांबे, त्रिदल संघटनेचे बाळासाहेब आंधळे, हरिभाऊ चितळे, बिभीषण पवार, थ्री

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त नीलक्रांती चौक मित्र मंडळ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) गटाच्याच्या वतीने अभिवादन

Image
  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त नीलक्रांती चौक मित्र मंडळ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) गटाच्याच्या वतीने वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना माजी नगरसेवक अजय साळवे समवेत अनिकेत विधाते, अविनाश शिंदे, प्रशांत भोसले, रोहित अल्हाट, मोहम्मद सय्यद, दादू मगर, भारत ठोंबरे, प्रदीप साळवे, विकी साळवे, रविराज साळवे, ऋतिक साळवे, भैरव पंडागळे, यश साळवे, निखिल साळवे, राहुल साळवे आदी उपस्थित होते.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला अभिवादन.

Image
  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला अभिवादन.  अण्णाभाऊ साठे यांचा शहरात पूर्ण कृती पुतळा उभारण्याची मागणी- सुरेश बनसोडे.    अहमदनगर - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना प्रा.माणिक विधाते, सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, संजय लोखंडे, सिद्धार्थ आढाव, पप्पू पाटील, सोमा शिंदे, समिर भिंगारदिवे, वैभव जाधव, सतिश साळवे, येशूदास वाघमारे, सुभाष वाघमारे, राजा जयस्वाल, मतीन शेख, दिपक लिपाने, जय कदम, लोखंडे सर आधी सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.       या वेळी प्रा.माणिक विधाते म्हणाले की, ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या महापुरुषांचे जयंती साजरी करणे गरजेचे असून अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोठे असून ग्रामीण भागातील जनतेला जनजागृती करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी कसा भाग घेता येईल या पद्धतीने त्यांनी कार्य केलेले असून अण्णाभाऊ साठे यांच्या विविध कलेपासून देखील लोकांना जनजागृती केले असल्याचे सांगितले व सुरेश बनसोडे म्हणाले की नगर शहरातील महापु

खून व हल्ल्याशिवाय आमच्याकडे ब्रेकिंग न्यूज नाही

 खून व हल्ल्याशिवाय आमच्याकडे ब्रेकिंग न्यूज नाही नगर जिल्ह्यात सारेच कसे शांत शांत, चर्चेचे झाले कारण अहमदनगर : दर महिना-दीड महिन्याला पडणारा एक खून... दर आठ-पंधरा दिवसांनी टोळक्यांमध्ये होणारे एकमेकांवरील जीवघेणे हल्ले... पुरेसा पडत नसलेला पाऊस किंवा पाऊस होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज एवढे दोन-तीन विषय सोडले तर नगर शहर व जिल्ह्यात राज्य हादरवून टाकेल अशी कोणतीही ब्रेकिंग न्यूज मागील दीड-दोन महिन्यात नाही. टीव्हीवर जेव्हा पावसाने, दरड कोसळल्याने, वाहनांच्या तोडफोडी, दहशतवादी पकडल्याने अशा अनेक विविध विषयांवर अनेक शहरे ब्रेकिंग न्यूज देतात व दिवसभर गाजत राहतात; त्या तुलनेत नगर जिल्ह्यात खून व खुनी हल्ले आणि नसलेला पाऊस या व्यतिरिक्त कोणतीही ब्रेकिंग न्यूज नाही. याचा आनंद व्यक्त करायचा की खंत, हाच खरा प्रश्‍न आहे, पण आमचे नगर कोणत्याही ब्रेकिंग न्यूजमध्ये नसल्याने हे शहर व जिल्हा जिवंत आहे की नाही, असा प्रश्‍न राज्यातील अन्य शहरवासीयांना पडू शकतो. आमच्याकडे राज्य गाजवेल अशी कोणतीही घटना एवढ्यात घडली नसल्याने सामान्य नगरकर व जिल्हावासीय काहीसे सुखात आहेत व ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या मान

भाजपचे नवे कारभारी

Image
तव्यावरची भाकरी फिरवली नाही तर ती करपते असे बोलले जाते. राजकारणही याला अपवाद नसते. जशा शासकीय नोकर्‍यांमध्ये दर अडीच-तीन वर्षांनी अधिकार्‍यांच्या बदल्या होतात तसेच राजकीय पक्षातही अडीच-तीन वर्षांनी स्थानिक स्तरावर कारभारी बदलले जातात. नगर जिल्हा भाजपमध्ये नुकतेच बदललेले कारभारी आता चर्चेत आहेत. भाजपने नवे कारभारी दिले असले तरी जुनीच भाकरी फिरवली की काय अशी शंका व्यक्त होत आहे. नगर शहराच्या जिल्हाध्यक्षपदी अभय आगरकर व नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव लंघे ही दोन नावे तशी जुनीच आहेत. आगरकरांनी याआधीही शहर जिल्हाध्यक्षपद भूषवले आहे; तर लंघे यांनी याआधी संपूर्ण ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्षपद सांभाळले आहे. फक्त या दोघांच्या जोडीला नगर तालुक्यातील वाळकीचे सुपुत्र दिलीप भालसिंग हे दक्षिण नगर जिल्ह्याचे झालेले जिल्हाध्यक्ष एकमेव नवा चेहरा आहेत. अर्थात आता या तीनही जिल्हाध्यक्षांच्या कार्यकर्तृत्वाचा कस आगामी सर्वच निवडणुकांमध्ये लागणार आहे. भाजपमध्ये बदल होण्याच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून माध्यमांमध्ये येत होत्या. त्या बातम्यांना आता यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला आहे.  भाजप हा केंद्रातील