लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला अभिवादन.

 लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला अभिवादन. 

अण्णाभाऊ साठे यांचा शहरात पूर्ण कृती पुतळा उभारण्याची मागणी- सुरेश बनसोडे.  


अहमदनगर - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना प्रा.माणिक विधाते, सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, संजय लोखंडे, सिद्धार्थ आढाव, पप्पू पाटील, सोमा शिंदे, समिर भिंगारदिवे, वैभव जाधव, सतिश साळवे, येशूदास वाघमारे, सुभाष वाघमारे, राजा जयस्वाल, मतीन शेख, दिपक लिपाने, जय कदम, लोखंडे सर आधी सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.      
यावेळी प्रा.माणिक विधाते म्हणाले की, ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या महापुरुषांचे जयंती साजरी करणे गरजेचे असून अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोठे असून ग्रामीण भागातील जनतेला जनजागृती करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी कसा भाग घेता येईल या पद्धतीने त्यांनी कार्य केलेले असून अण्णाभाऊ साठे यांच्या विविध कलेपासून देखील लोकांना जनजागृती केले असल्याचे सांगितले व सुरेश बनसोडे म्हणाले की नगर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात लवकरच कामे चालू होणार असून आजच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचा अहमदनगर शहरात देखील पूर्ण कृती पुतळा उभारण्याची मागणी देखील करण्यात येणार असल्याचे सांगितले......

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद