Posts

डाक विभागाचे वतीने इंदिरानगर केडगाव येथे आधारकॅम्पचे आयोजन

Image
भारतीय डाक विभाग अहमदनगर व बास्को ग्रामीण विकास केंद्र यांचे वतीने आयोजित  आधार कॅम्प  उद्घाटन करताना केडगाव चे पोस्टमास्तर श्री संतोष यादव समवेत उपस्थित रहिवासी अहमदनगर: भारतीय डाक विभाग अहमदनगर  व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र,केडगाव अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर येथील जि प शाळा केडगाव येथे स्थलांतरित कुटुंबासाठी आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फा.जॉर्ज डाबरिओ यांनी कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन केले व केडगाव डाकघरचे पोस्टमास्तर श्री. संतोष यादव  यांनी कॅम्प साठी साहित्य व कर्मचारी उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले श्री संतोष यादव यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यासाठी भारतीय डाक विभागाच्या वतीने कॅम्पस्थळी स्वतंत्र संगणकीयप्रणाली बसवून कॅम्पसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.अहमदनगर प्रधान डाकघर मधील श्री बापूसाहेब तांबे व श्री.प्रकाश कदम यांनी संगणकीय कामकाज पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विलास आल्हाट यांनी तर आभार श्रीमती.भावना घाटविसावे यांनी केले.यावेळी शाळेचे  मुख्याध्य...

अहमदनगर प्रधान डाकघराच्या प्रभारी सिनियर पोस्टमास्तरपदी श्री संदीप कोकाटे

Image
नूतन  प्रभारी सिनियर पोस्टमास्तर श्री संदीप कोकाटे यांचा सत्कार करताना पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव समवेत श्री कमलेश मिरगणे,प्रकाश कदम,बापु तांबे अहमदनगर : प्रधान डाकघर अहमदनगराच्या प्रभारी सिनियर पोस्टमास्तरपदी आज श्री संदीप कोकाटे यांनी पदभार स्वीकारला.  श्री संदीप कोकाटे यांनी यापूर्वी बीड, रत्नागिरी तर अहमदनगर विभागात श्रीगोंदा ,आनंदीबाजार व अहमदनगर सिटी पोस्ट ऑफिस याठिकाणी सब पोस्टमास्तर म्हणून काम पाहिलेले आहे. त्याची एक कुशल प्रशासक व कामगार प्रिय म्हणून ओळख आहे. प्रधान डाकघराचे पोस्टमास्तर हे पद मागील काही काळापासून रिक्त असून यापदी प्रभारीपदी अगोदर श्री गोरख दहिवाळकर श्री महेश तामटे यानी काम पाहिले आहे. आज पोस्टमास्तर म्हणून श्री संदीप कोकाटे यांनी कार्यभार स्वीकारला,त्यानिमित्ताने नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी श्री  शिवाजी जावळे, श्री बापू तांबे,श्री प्रकाश कदम,श्री सागर पंचारिया, श्री कमलेश मिरगणे,श्री नितिन थोरवे,श्री तान्हाजी सूर्यवंशी श्रीमती हिरा मगर,श्रीमती आश्विनी चिंत...

अध्यक्षपदी बापू तांबे तर सचिवपदी श्रीकांत नरसाळे यांची निवड

Image
आपुलकी मित्रमंडळाच्या वतीने दिपावली निमित्त ब्लँकेट व मिठाईचे वाटप करताना नूतन अध्यक्ष श्री बापू तांबे मेजर समवेत मंडळाचे सदस्य पारनेर (प्रतिनिधी)  गोरेगाव ता पारनेर येथील आपुलकी मित्र मंडळाची  वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच श्री गोरेश्वर मंदिर परिसर येथे  सर्व सभासदाच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.    या सभेत मंडळाचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री बापू तांबे (मेजर), उपाध्यक्ष म्हणून श्री रावसाहेब तांबे तर सचिव म्हणून श्री श्रीकांत नरसाळे यांची  एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.  मंडळाची स्थापना मागील तीन वर्षांपूर्वी झाली असून सतत सामाजिक उपक्रम  राबविण्याचा  मंडळाचा प्रयत्न असतो . याचाच एक भाग म्हणून कोरोना  महामारीच्या काळात मंडळाने  गोरेगाव येथील कोविड सेंटरसाठी मंडळाच्या वतीने मदत केली.सर्व  सभासदाच्या अनमोल योगदानामुळे मंडळाकडे आवश्यक निधी जमा होतो व यानिधीतुनच सामाजिक कामे करण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो. आज मंडळामध्ये एकूण 14 विश्वासु सदस्य असून त्यामध्ये सर्वश्री रामदास नरसाळे, साहेबराव नरसाळे, जयराम तांबे, त्रिभुवन ल...

पोस्टल संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी श्री संतोष यादव यांची निवड

Image
पोस्टल संघटनेचे नूतन राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांचा सत्कार करताना श्री आर एच गुप्ता,श्री संदीप कोकाटे,श्री कमलेश मिरगणे, महादेव गोपालघरे,आनंद गवळी अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अहमदनगरचे संतोष यादव यांची धुळे येथे संपन्न झालेल्या  राज्यकार्यकारणी सभेत निवड सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची तीन दिवसीय राज्य कार्यकारणी सभा संपन्न होत असून या सभेस राज्यभरातून पदाधिकारी आलेले असून या सभेत टपाल कर्मचाराच्या विविध प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा होत आहे. श्री संतोष यादव यांच्या निवडीबदल त्याचे मा श्री रामभजन गुप्ता मुंबई,श्री महादेव गोपालघरे मुंबई,श्री संदीप कोकाटे,श्री कमलेश मिरगणे श्री कालुराम पारखी,श्री चंद्रकांत चांदरे पुणे,श्री आनंद गवळी कोल्हापूर,श्री संतोष कदम  ठाणे,श्री महेश पल्लेवाड सोलापूर,श्री बालाजी राखिले रत्नागिरी,श्री महेश कौठकर यांचेसह राजभरातील आलेल्या पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ४६ विद्यार्थ्यांची इपिटोम मध्ये निवड- श्री अमित कोल्हे..... एका पाठोपाठ नामांकित कंपन्या करीत आहे संजीवनीच्या विद्यार्थ्यांची निवड

Image
कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या प्रयत्नाने इपिटोम काॅम्पोनंटस् प्रा. लिमिटेड या बहुराष्ट्रीय  कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या २०२०-२१  या शैक्षणिक वर्षाच्या  अंतिम सत्रातील  इंजिनिअरींगच्या विविध विद्या शाखांमधिल ४६ विद्यार्थ्यांची  नोकरीसाठी निवड केली आहे. अनेक नामांकित कंपन्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांची  एका पाठोपाठ निवड करीत असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये  आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजने विभाग निहाय उद्योग जगताला अभिप्रेत असणारे कौशल्ये व आधुनिक तंत्रज्ञान अवगत असणारे अभियंते तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे  जास्तीत जास्त विद्यार्थी नामांकित कंपन्यांच्या कसोटींच्या कक्षा पुर्ण करीत आहे.     अलिकडेच इपिटोम या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांची  यादी ...

कोपरगांव तालुक्यासाठी मंजूर झालेला निधी तुटपुंजा व शेतकऱ्यांची निराशा करणारा - परजणे

मागील जून ते ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झालेले असताना कोपरगांव तालुक्यासाठी केवळ ५० लाख ४२ हजाराचा निधी उपलब्ध झाल्याचे समजते, हा निधी अतिशय तुटपुंजा असून ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची घोर निराशा करणारा आहे. पीक नुकसानीच्या वस्तुनिष्ठ परिस्थितीची फेर पडताळणी करुन शासनाने निधी वाढवून द्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी केली. श्री परजणे यांनी यासंदर्भात  तहसीलदार विजय बोरुडे यांना दिलेल्या निवेदनातून तालुक्यातील शेती पिकांच्या नुकसानीबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन निधी उपलब्ध झाला असल्याचे शासकीय यंत्रणा सांगते परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात अद्याप काहीच पडले नाही. त्यातच रविवारी ( १७ ऑक्टोंबर ) कोपरगांव तालुक्याला परतीच्या पावसाने पुन्हा झोडपल्याने शेतकऱ्यांच्या हातातून होते नव्हते ते सर्व गेले आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून शासनाने पुन्हा पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट नुकस...

एस. एस. जी. एम. महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा. सुभाष देशमुख यांना दोन सुवर्ण पदके प्राप्त....

Image
सुभाष देशमुख यांनी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर कँटेगिरीमध्ये ९३ किलो वजन गटात क्लासिक व इक्विप्ड  या दोन्ही प्रकारात दोन सुवर्ण पदक पटकावली आहेत.( छाया मयूर फीचर्स कोपरगाव ) कोपरगाव प्रतिनिधी  येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजमधील क्रीडा संचालक प्रा.सुभाष देशमुख यांनी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर कँटेगिरीमध्ये ९३ किलो वजन गटात क्लासिक व इक्विप्ड  या दोन्ही प्रकारात दोन सुवर्ण पदक पटकावली आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी त्यांची महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग संघात निवड झाली आहे.  प्रा. सुभाष देशमुख यांच्या यशस्वी कामगिरीने महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.त्यांची ही कामगिरी महाविद्यालयाच्या दृष्टीने भूषणावह असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.               त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अ...

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता

Image
शिर्डी  :-            श्री   साईबाबा   संस्थान   विश्वस्तव्यवस्था ,  शिर्डीच्या   वतीने   दिनांक  १४ ऑक्‍टोबर पासून सुरु असलेल्‍या श्रींची पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता आज  काल्याच्या   कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली. आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती ,  त्‍यानंतर पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ०६.०० वाजता संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व त्‍यांचे पती संजय धिवरे   सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग ,  नाशिक यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा व गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्‍यात आली. सकाळी १०.०० वाजता मंदिर पुजारी उल्‍हास वाळुंजकर यांचे गोपाळ काल्‍याचे कीर्तन झाले. काल्‍याच्‍या कीर्तनानंतर समाधी मंदिरात उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग ,  नाशिक संजय धिवरे यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार...

श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेला प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रम पार पडला

Image
शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था ,  शिर्डी च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०३ वा श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी  रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेला प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रम पार पडला. उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्‍तीनंतर श्री साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा  संस्थानचे तदर्थ समिती ,  अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा  व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी प्रतिमा ,  अप्‍पर महसुल विभागीय आयुक्‍त ,  नाशिक तथा संस्‍थान तदर्थ समिती सदस्‍य भानुदास पालवे यांनी वीणा आणि संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी पोथी घेवुन सहभाग नोंदवला.  यावेळी सौ.मालती यार्लगड्डा ,  सौ.सुनिता  पालवे ,  सौ.वैशाली ठाकरे ,    सरंक्षण...

बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ

Image
सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या ५९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदियन समारंभ संचालक सोपानराव पानगव्हाणे, कुसुम पानगव्हाणे, अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी झाला त्याप्रसंगीचे छायाचित्र. (छाया- राहुल फोटो, कोपरगांव) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासन देशातील सहकार व शेतकरी जगविण्यांचा अटोकाट प्रयत्न करत असताना राज्य शासन येथील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून परराज्यातील शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवत आहे अशी टिका संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केली. राज्य शासनाने सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सहवीज निर्मीती करारास १० वर्षाची मुदतवाढ देऊन वीज खरीदिच्या दरात प्रतीयुनीट दीड ते दोन रुपयांची वाढ करावी, संजीवनी ऊस भावात जिल्ह्यात मागे राहणार नाही असे ते म्हणाले. विजयादशमीनिमित्त कोपरगाव मतदार संघातील सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.            सहकार महर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांच्या ५९  व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शुक्रवारी विजयादशमीच्या मुहुर्तावर माजीमंत्री शंकरराव कोल्हे, बिपीन...