Posts

श्री किशोर नेमाने यांची पोस्टल सोसायटीच्या संचालकपदी निवड

Image
पोस्टल सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक श्री किशोर नेमाने यांचा सत्कार करताना पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव समवेत सचिन मोरे,शिवाजी भापकर, सागर वाघमारे अहमदनगर: अहमदनगर पोस्टल डिव्हीजन को ऑप क्रेडीट सोसायटीच्या  संचालकपदी वाहननगरचे (व्हीआरडीई) सब पोस्टमास्तर श्री किशोर नेमाने यांची  पुढील पाच वर्षाकरिता निवड झाल्याची अधिकृतपणे घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मा श्री व्ही के मुटकुळे  यांनी अधिकृत पत्राद्वारे केली.   त्यानिमित्ताने वाहननगर पोस्ट ऑफिसमध्ये आयोजित सत्कार प्रसंगी पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव बोलताना म्हणाले की,आपली या संस्थेवर संचालकपदी झालेली निवड ही आपण आजवर केलेल्या विधायक कामाची पावतीच आहे.संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करताना मोठी जबाबदारी असते. आपल्याकडून निश्चितच  या जबाबदारीची जाणीव ठेऊन कामकाज होईल.आपल्यावर सभासदाने टाकलेल्या विश्वास पात्र राहत कारभार कराल.त्याच बरोबर संस्थेच्या सर्व सभासदाच्या हितास प्राधान्य द्याल,अशी अपेक्षा श्री संतोष यादव यांनी व्यक्त केली. त्याची  निवड झालेबदल त्याचा वाहननगर पोस्ट ऑफिसमध्ये  पोस्ट...

पोस्टल संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी अहमदनगरचे संतोष यादव.... सचिवपदी ठाणेचे श्री संतोष कदम........ श्रीरामपुर येथे संपन्न झाले रौप्य महोत्सवी अधिवेशन

Image
नवनिर्वाचित राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव  यांचा सत्कार करताना श्री शिवाजी कांबळे, श्रीमंती शुभांगी मांडगे, श्रीमती सविता ताकपेरे ,अनिल धनावत. अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल असोसिएशन ग्रुप सी महाराष्ट्रचे  रौप्य  महोत्सवी अधिवेशन दि 17 ते 19 दरम्यान मा खा गोविंदराव आदिक सभागृह  श्रीरामपुर येथे संपन्न झाले. त्यामध्ये अहमदनगरचे श्री संतोष यादव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. या अधिवेशनाचे उदघाटन मा खा सदाशिवराव लोखंडे,तर प्रमुख पाहुणे मा  आमदार श्री लहुजी कानडे,तर संघटनेचे राष्ट्रीय नेते मा श्री बी शिवकुमार दिल्ली,श्री शिवाजी वासू रेड्डी दिल्ली यांचे सह महाराष्ट्रातील चाळीस विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते.  या सर्वांच्या उपस्थितीत  संघटनेची पुढील दोन वर्षासाठी पुढील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली   अध्यक्ष श्री रामभजन गुप्ता (मुंबई)उपाध्यक्ष संतोष यादव (अहमदनगर) श्री धनंजय यमतकर (अकोला) श्री आनंद गवळी (कोल्हापूर),मंडळ सचिव श्री संतोष कदम (ठाणे) सहायक मंडळ सचिव श्री काळूराम पारखी (पुणे),श्री संजय सनातन (औरंगाबाद),श्री ध...

भारतीय डाक विभागाचे सेवा घराघरापर्यंत.. मा खा सदाशिवराव लोखंडे....... पोस्टल संघटनेचे तीन दिवसीय रौप्य महोत्सवी अधिवेशन

Image
  नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्र सर्कलचे  रौप्य महोत्सवी  खुल्या अधिवेशनाचे  उदघाटन करताना मा खा सदाशिवराव लोखंडे, मा आ श्री लहुजी कानडे,श्री बी शिवकुमार, आर एच गुप्ता , अरविंदजी साळवे, संतोष यादव, काळूराम पारखी, सुनील झुंझारराव,संतोष कदम,श्री आशुतोष देशपांडे,आनंद गवळी, बबनराव शिंदे,महादेव गोपालघरे,राजेंद्र विश्वास ,विजया शहाणे,गोरक्ष कांबळे,गोरख दहिवाळकर श्रीरामपुर:   भारतीय डाक विभागाच्या सेवा सर्वसामान्याच्या घराघरात पोहचल्या आहेत ही अतिशय अभिमानाची बाब आहे  असे प्रतिपादन मा खा सदाशिवराव लोखंडे यांनी केले.  नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्र सर्कलचे  रौप्य महोत्सवी अधिवेशन श्रीरामपुर येथे मा खा गोविंदराव आदिक सभागृह श्रीरामपुर येथे सूरु झाले. पोस्टऑफिसच्या लोकाभिमुख सेवा अधिकाधिक लोकप्रिय करणेकरिता आपण  अनमोल सेवा देत आहात तसेच कोविड कालखंडात आपण अखंडित सेवा दिल्या याविषयी विशेष कौतुक केले, व अशीच सेवा पुढील कालखंडात  असेच चालू  ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.आपले कार्यालये अद्यावत...

पोस्टल संघटनेचे रौप्यमहोत्सवी राज्य अधिवेशन...... कर्मचाऱ्याचा न्याय व प्रलंबित मागण्यांवर होणार अधिवेशनात चर्चा.......

Image
डाकविभागातील मान्यताप्राप्त संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन प्रथम:च अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथे होत असल्याने सभासदामध्ये उत्सवाचे वातावरण आहे. या अधिवेशनात निश्चित सभासदाच्या न्याय व प्रलंबित मागण्यांवर सविस्तरपणे उदापोह होईल.  - संतोष यादव राज्य उपाध्यक्ष अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्र व गोवा सर्कलचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन मा खा गोविंदरावजी आदिक सभागृह संगमनेर रोड श्रीरामपुर येथे दि 17 ते 19 एप्रिल दरम्यान आयोजित केले असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी दिली.     रविवार दि 17 एप्रिल रोजी  सकाळी 10 वाजता या अधिवेशनाचे खुले अधिवेशनाचे उदघाटन मा खा श्री सदाशिवराव लोखंडे खासदार शिर्डी, तर मा श्री लहुजी कानडे आमदार श्रीरामपुर, मा श्रीमती वीणा रामकृष्ण श्रीनिवास चिफ पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मा श्री बी शिवकुमार सेक्रेटरी जनरल FNPO दिल्ली ,श्री शिवाजी वासिरेड्डी जनरल सेक्रेटरी ग्रुप सी दिल्ली,श्री निसार मुजावर जनरल सेक्रेटरी पोस्टमन दिल्ली, श्री रामभजन गुप्ता...

अहमदनगर प्रधान डाकघर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी.

Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रसंगी मानवंदना देते वेळी मा श्री एस रामकृष्ण,श्री संदिप कोकाटे,पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव,प्रदिप सूर्यवंशी अहमदनगर: अहमदनगर प्रधान डाकघरमध्ये मा श्री संदीपजी कोकाटे प्रभारी सिनियर पोस्टमास्तर व मा श्री एस रामकृष्ण प्रवर अधिक्षक डाकघर यांचे प्रमुख उपस्थितीत महामानव,भारतीय घटनेचे शिल्पकार,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्याउत्सवात साजरी करण्यात आला. यावेळी पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ बाबासाहेबजी आंबेडकर यांचे अतुलनीय कार्या विषयी सविस्तरपणे माहिती दिली. यावेळी श्री राजू राहिंज,श्री सतिष येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आदरणीय डॉ बाबासाहेबजी आंबेडकर मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन मनोरंजन कक्षाच्यावतीने युवा नेते श्री प्रदिप सूर्यवंशी, श्री कमलेश मिरगणे,श्री दिपक नागपुरे यांनी केले. यावेळी श्री रमीत रोहिला,श्री राधाकिसन मोटे,श्री अजित रायकवाड,श्री सुरज गायकवाड,श्री दिपक जेसवानी,श्री आनंद भोंडवे, श्री विजय चाबुकस्वार,श्री झुंबरराव विधाते यांचे सह मोठ्या संख्येने...

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

Image
श्री अशोक शेजुळ लिखित कृपाछत्र या पुस्तकाचे विमोचनप्रसंगी ह भ प शिंगोटे महाराज,श्री आर एन जाधव,श्री बाळासाहेब भुजबळ, श्री माऊली गायकवाड,इ .   अहमदनगर: स्वतःचे आत्मचरित्र लिहीत असताना आपल्यातील *मी* बाजूला ठेवत ते लिहणे ही खरोखरच तारेवरची कसरत आहे,त्याच बरोबर संघर्षमय जीवनाताच खरा आनंद असून त्यामधूनच माणूस समृद्ध होत असतो,आपल्याबरोबर सर्वानाच बरोबर घेऊन चालतो तोच खऱ्या सर्वार्थाने उंचीवर जाऊ शकतो असे प्रतिपादन श्री आर एन जाधव सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त यांनी केले. श्री अशोक शेजुळ सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी लिखित *कृपाछत्र* या पुस्तकाच्या विमोचन सोहळा मधुरंजनी सभागृह सावेडी येथे श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर पार पडला. या कार्यक्रमासाठी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब भुजबळ,प्रांत उपाध्यक्ष श्री माऊली मामा गायकवाड, नगरसेविका मा सौ दिपालीताई बारस्कर,नितीनजी बारस्कर,अमितजी वाघमारे,बाबुराव दळवी,बापूसाहेब औटी,पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव उपस्थित होते. श्री संतोष यादव आपल्या मनोगतात म्हणाले की, श्री अशोक शेजुळ यांनी आपल्या आयुष्यातील आजवरच्या प्रवासाचे यथार्थ वर्ण...

सरकारच्या कामगार विरोधी धोरणाबाबत टपाल कर्मचारी आक्रमक........ जोरदार घोषणाने दुमदुमून गेला परिसर

Image
अहमदनगर प्रधान डाकघराच्या समोर आयोजित द्वारसभेस संबोधित करताना संघटनेचे नेते श्री संतोष यादव समवेत श्री कमलेश मिरगणे,श्री प्रमोद कदम,अमित कोरडे,श्री संदीप कोकाटे, सुनिल थोरात,नामदेव डेंगळे ,सलीम शेख,भाऊ श्रीमंदिलकर अहमदनगर: नवीन पेन्शन योजना रद्द करून पूर्ववत जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा, डाक विभागाच्या खाजगीकरणांच्या हालचाली थांबवा,यासह सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात टपाल विभागातील दोन्हीही मान्यताप्राप्त संघटना सहभागी झाल्यामुळे अहमदनगर विभागातील टपाल सेवा ठप्प झाल्याचा  दावा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी केला आहे. टपाल विभागातील दोन्हीही मान्यताप्राप्त संघटना आपल्या केंद्रीय संघटनेच्या आवाहनानुसार संघटनेचे सभासद या दोन दिवसीय संपात सहभागी झालेले आहेत.आज संपाच्या पहिल्यादिवशी  अहमदनगर प्रधान डाकघराच्या समोर द्वारसभेचे आयोजन केले होते सभेस श्री संतोष यादव यांनी  मार्गदर्शन करताना म्हणाले की,जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा,कामगार कायद्यात सकारात्मक बदल करा  टपाल विभागातील संघटनेच्या पदाधिकाऱ्याची  छळवणूक थांबवा, कोरोना...

दोन दिवसीय देशव्यापी संपात टपाल कर्मचारी सहभागी होणार - संतोष यादव

अहमदनगर: दि 28 व 29  मार्च या दोन दिवसीय देशव्यापी संपात नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगर सहभागी होत असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी दिली. या दोन दिवसीय संपात केंद्रीय संघटनेच्या आदेशानुसार आम्ही सहभागी होत असून,केंद्र सरकारच्या नवीन कामगार विरोधी धोरणा सह खाजगीकरणास विरोध, या सहनवीन पेन्शन योजना रद करावी व  सर्वाकरिता जुनी पेन्शन सुरू करावी. डाक विभागातील कर्मचाऱ्याचा न्याय व प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा ,कोविड कालावधीत कर्मचाऱ्याचा विविध समस्यांचे निवारण करणेबाबत, डाकविभागातील सर्वाकरिता पाच दिवसाचा आठवडा सुरू करा यासह विविध मागण्यांसाठी आम्ही या संपात सहभागी होत आहोत तरी अहमदनगर विभागातील संघटनेच्या सभासदांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री कमलेश मिरगणे,श्री सुनिल थोरात,श्री आसिफ शेख यांनी केले आहे.

पोस्टल कर्मचाऱ्याच्या न्याय व प्रलंबित मागण्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार श्री आर एच गुप्ता......... श्री आर एच गुप्ता यांची डेप्युटी सेक्रेटरीपदी निवड

Image
श्री आर एच गुप्ता महाराष्ट्र यांची कुरुक्षेत्र येथील अधिवेशनात डेप्युटी जनरल सेक्रेटरीपदी निवड झालेबदल त्याचा सत्कार करताना महाराष्ट्रातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी अहमदनगर:  नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी चे चोविसावे अखिल भारतीय अधिवेशन श्रीक्षेत्र कुरुक्षेत्र हरियाणा येथे  दि 6 ते 8 मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. देशभरातील विविध राज्यातील  जवळपास एकहजार तर महाराष्ट्रातील दिडशे सभासदांनी या अधिवेशनात सहभाग घेतला होता.अहमदनगर विभागातून टपाल कर्मचारी संघटनेचे नेते श्री संतोष यादव व कमलेश मिरगणे यांनी आपला सहभाग नोंदविला. या तीन दिवसीय अधिवेशनात टपाल कर्मचाऱ्याचा विविध समस्या, स्टाफ शॉर्टज,कॅनेक्टिव्हिटी मध्ये वारंवार येत असलेल्या अडचणी, दि 28 व 29 मार्च रोजीचा प्रस्तावित दोन दिवसीय संप,यावर सविस्तरपणे चर्चा झाली.अनेक सभासदांनी आपले मनोगत या अधिवेशनात व्यक्त करून यावर निर्णायक तोडगा काढण्याची विनंती याठिकाणी व्यक्त केली. पुढील दोन वर्षांकरिता श्री बी शिवकुमार (कर्नाटक) यांची अध्यक्षपदी ,श्री शिवाजी वसू रेड्डी (आंध्रप्रदेश) यांची जनरल सेक्रेटरी तर...

अल्पबचत अभिकर्ते यांचा गौरव करत साजरा केला महिला दिन......केडगाव पोस्टऑफिसचा उपक्रम

Image
केडगाव पोस्ट ऑफिसच्या प्रभारी पोस्टमास्तर सौ शुभांगी मांडगे या महिला दिनानिमित्त महिला प्रधान अभिकर्ते यांचा गौरव करताना समवेत सौ सविता ताकपेरे अहमदनगर:   पोस्टऑफिसच्या विविध योजनेत आपले अनमोल योगदान असणाऱ्या महिला प्रधान अभिकर्ते यांचा आज महिला दिनाच्या औचित्य साधत विशेष गौरव करण्यात आला. समाजामध्ये घरोघरी संपर्क करत,अल्पबचतीचे महत्त्व सांगत, पोस्टऑफिसच्या योजनेची माहिती ग्राहकांना सांगत आपली बचत पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करणेकरिता ग्राहकांना प्रोत्साहित करणेकरिता महिला प्रधान अभिकर्ते यांचे मोठे योगदान आहे .केडगाव पोस्टऑफिस अंतर्गत जवळपास पन्नास पेक्षा अधिक महिला प्रधान अभिकर्ते कार्यरत असून त्याच्या अनमोल योगदानमुळेच केडगाव पोस्टऑफिस विविध योजनेत  सातत्याने उल्लेखनिय कामकाज करत  असते. त्यामुळेच आज या विशेष दिनाचे औचित्यसाधत आज त्याचा विशेष गौरव प्रभारी पोस्टमास्टर सौ शुभांगी मांडगे, सौ सविता ताकपेरे यांचे हस्ते श्रीमती लता कोरे, पंकजा धर्म, रंजना वाघ,निता चौधरी, कुसुम रोहकले, गुलाब कटारिया, संगीता शर्मा, रेवती शेटे, श्रीमती  रेखा पावसे, श्रीमती अस्मिता कुलकर्...