कोपरगाव नगरपालिका अत्यावश्यक सेवा वगळता पुढील चार दिवस बंद


कोपरगाव (प्रतिनिधी) : शहर व व तालुक्यातील परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या  वाढतच आहे  23 मार्चच्या टाळे बंदीनंतर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होत  रात्रंदिवस कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर कार्यरत आहेत आता पालिकेतही कोरोना चा शिरकाव झाल्याने दि १   ते ४ ऑक्टोबर  पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पालिका कार्यालय  बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

शहरातील  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी  नगरपालिकेचे अधिकारी कामगार विविध उपाय योजना व त्याची अंमलबजावणी करत आहे. तसेच नागरिकांना नियमितपणे स्वच्छतेची व विविध सेवा सुविधा  पुरवण्याचा प्रयत्न  करीत आहे . या दरम्यान मोठ्या प्रमाणात विविध कारणामुळे अनेक व्यक्तींचा संपर्क येतो त्यातूनच नगरपरिषदेचे काही अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना संसर्ग झाला आहे कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची तपासणी व स्वॅप नमुने घेण्यात आले आहेत अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. नागरिकांनीही स्वतःची काळजी घ्यावी घराबाहेर कामाव्यतिरिक्त पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे .

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

आजी, माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद