शहरातील विस्थापितांना न्याय मिळावा हीच आमची भावना - दत्ता काले

 कोपरगाव - प्रतिनिधी

शहरातील विस्थापित झालेल्या अतिक्रमण धारकांना गेल्या दहा वर्षापासुन न्याय मिळालेला नाही, याप्रश्नी वारंवार निवेदन देउनही प्रश्न मार्गी लागत नाही, म्हणून  व्यापारी संघर्ष समितीने हाती घेतलेल्या आंदोलनास पाठींबा आहे विस्थापितांना न्याय मिळावा हीच आमची भावना असल्याचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी म्हंटले आहे


 काले  म्हणाले ,  दहा वर्षापुर्वी शहरातील  अतिक्रमणे काढण्यात  आली होती, यामध्ये अनेक छोटे व्यावसायिक विस्थापित झाले,त्यामुळे अनेक कुटूंबाची उपासमार झाली,  अनेक कुटूंबे उध्दवस्त झाली. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून माजी आमदार  स्नेहलता कोल्हे यांनी वारंवार बैठका घेउन पाठपुरावा केला. त्याप्रमाणे नगरपरिषदेच्या १५ एप्रिल२०१७ रोजी सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठरावही मंजुर करण्यात आला. तसेच यापुर्वी माजी मंत्री शंकरराव कोल्हे , बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन नगराध्यक्ष सुरेखा राक्षे यांच्या कार्यकाळात नगररचना विभागास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार प्रधानसचिव यांच्या अभिप्रायानुसार नेमून दिलेल्या जागेवर खोकाशाॕप करणेस सुचविले होते. परंतु   नगरपरिषदेने विस्थापितांना  खोकाशाॕप करून दिले नाही.   पालिका या प्रश्नी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने  व्यापारी संघर्ष समितीने हे आंदोलन हाती घेतले आहे जो पर्यंत हा प्रश्न तडीस जात नाही, तोपर्यंत या आंदोलनात  शहर भारतीय जनता पार्टी  समितीच्या सोबत असल्याचे श्री काले यांनी सांगून, खोका शाॕप  प्रश्‍नी बाबत काहींनी खोट्यानाट्या वावड्या उठवल्याने छोटेमोठे व्यापारी संभ्रमात आहेत. विस्थापितांच्या प्रश्नांवर राजकारण करु नये असा सल्ला  काले यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद