अहमदनगर : आजी , माजी सैनिकांचे विविध प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालय , पाथर्डी येथे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली १९ जुलै , २०२४ रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या आजी , माजी सैनिकांचे जमिनी , अतिक्रमण , निवृत्तीवेतन , कुटुंबियावरील अन्यायाबाबत काही प्रश्न , अडीअडचणी असतील त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे. आपल्या अडीअडचणीबाबत लेखी स्वरूपात दोन प्रतीत अर्ज सादर करावा , असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment