प्रतिकारशक्ती आणि विषमुक्त अन्न हाच कोरोनावरील उपाय : सतीश नेने


कोपरगाव प्रतिनिधी

जगात जी महामारी चालू आहे ति फक्त माणसाची प्रतीकार शक्ती,विषमुक्त अन्न ह्या मुळेच आटोक्यात राहू शकते अशी माहिती प्रगतिशील शेतकरी सतीश नेने यांनी दिली .अति रसायनाचा  वापर,कारखानदारी ह्या मुळे समतोल बिघडतो आहे.त्यातून आपल्या पारंपारीक आयुर्वेद, युनानी सारख्या उपचारांना दुय्यम वागणूक व अँलीओपँथीला प्रथम दर्जा (मि कोठल्याही पँथीच्या विरूध्द नाही) हे कीती दिवस चालणार.?

      आज जगण्यासाठी लागणार्या अन्नास जे पुर्ण ब्रम्ह समजलेजाते त्यात सर्रास रसायनांचा वापर हे थोडे की काय त्याच्या उत्पादन व उत्पादना नंतर प्रक्रीया करतांना(शेतीतही) सर्रास अतिशय विषारी रसायनांचा वापर होतो आहे.दुध हे पुर्ण अन्न ठरत होते तेथेही सर्रास केमिकलचा वापर. एकूण दूभत्या जनावरांपासून मिळणार्या दुधाच्या पेक्षा जादा दुधाची विक्री होते हे जादा दूध येते कोठून ?पुर्वि जनावरे रानोमाळ हींडून चारा वैरण खायचे त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असायच्या व ते दुध औषधा सारखे व खुपच पोषक असायचे .आता एका जागेवर बांघून ठरावीकच खाणे दीले जाते ते दुध कीती पौष्टीक असेल ? पुर्वि अवर्जून प्रतीकार शक्ती वाढीसाठी सुरुवातीला आईचे दुध व नंतरच्या आयुष्यात गाय जनल्यानंतर मिळणारे पहीले कवळे दूध वापरत असत याच्या सारखे प्रतीकारशक्ती वाढीचे दुसरे औषध नाही.

      ह्या सर्वांचा विचार करून गेली सात वर्षे अथक प्रयत्नातुन मि ह्या साठी काही हर्बल पावडर तयार केल्या आहेत ज्यात कणभरही केमिकल नाही.
(१) डीप-एन-राईप (बुडवा आणि पिकवा) आजकाल सर्रास फंगीसाईड, इथेलीन,कार्बाइड सारखे घातक केमिकल आंबे,केळी ,पिकवतांना वापरतात मि ८/९ प्रकारच्या वनस्पतीं पासून बनवलेल्या ह्या पावडरच्या काढ्यात आंबे,केळी,पोपई तिन ते पांच मिनीटे बुडवून पिकत घातल्यास नैसर्गिक पणे फळे लवकर पिकतात,गोडी वाढते,कीपींग क्वालीटी वाढते,सुगंध वाढतो.
(२) अन्नपुर्णा (अँनिमल फीड सप्लीमेंट ) आताच्या दिवसांत जनावरे रानोमाळ वैरण खाण्यासाठी जात नाही पण ही हर्बल पावडर (१८/१९ वनस्पती वापरून केलेली) रोज दुभत्या,नवजात वासरांना खाण्यास दिल्या त्यांना ५०/५५ %रोगराईच येत नाही व १८/१९ % उत्पादन वाढते.स्तनरोग दगडीला अटकाव होतो,कँलशियम ,मिनरल्स,व्हीटँमिन्स,इसेन्शीयल अँमिनो अँसिडस, अँटीआँक्सीडंट कमी पडत नाहीत,जंत होत नाहीत,गर्भाशय स्वच्छ राहील्याने नियमित प्रेग्नन्सी मिळते,पचन चांगले होऊन भुक वाढते व शेणाची प्रत चांगली होते,रक्ताभिसरण चांगले राहून प्रतिकारशक्ती वाढते.जनावर तजेलदार व चपळ होते.
(३)सेफमिल्क   जनावरांची नवजात वासरे मेली तर ते जनावर दुधाचा पान्हा चोरते कींवा काही जनावरांना तशी खोडच असते त्यामुळे स्तनात दुध रहाते व त्याच्या गाठी बनून स्तनाचे रोग होतात.आशा वेळेस गोपालक घातक आँक्सीटोसिनचे इंजेक्शन देतात .दर वेळेस इजेक्शन देतांना जनावर घाबरते व बँड हर्मोन्स तयार होऊन दुधात उतरतात तसेच इंजेक्शनचे अंशही उतरतात असे दुध वापरण्यात आल्यास नपुंसकता,विनाकारण भिती वाटणे,बघीरता येणे असे होते ह्यासाठी ९/१० प्रकारच्या वनस्पती वापरून पावडर तयार केली आहे ती दूध काढण्याआघी दहा पंधरा मिनीटे जनावरांस दील्यास ते नैसर्गिकरित्या पुर्ण शुध्द दूध देते.
         आशाच प्रकारे माणसांसाठी सुध्दा औषधे तयार केली आहेत.ह्या सर्वांना महाराष्ट्रातून बरेच ठीकाणाहून नियमीत मागणी आहे.असे प्राँडक्ट अजून कोणीही बनवलेले नाहीत म्हणुन पेटंट (बैध्दीक संपदा) मुंबई आँफीसमघ्ये दाखल केले असल्याची माहिती प्रगतशील शेतकरी
      सतिश नेने, पढेगाव तालुका कोपरगाव यांनी दिली

Comments

  1. Best casino bonus codes 2021 | Free spins no deposit
    Find a list of the casino bonus codes and promotions for United worrione Kingdom players. Discover bonus codes for casinos with casinosites.one free spins no deposit on registration.‎How many titanium flat iron free spins febcasino.com do you receive from the casino? · ‎What are the bonuses for United Kingdom players? · ‎What are the free spins and promotions for United Kingdom players?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

आजी, माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन

वाळू वाहतूक वाहनांचे सुधारित दर जाहीर