गोदावरी दूध संघ व बायफ संस्थेच्यावतीने जि. प. शाळांना वॉटर फिल्टरचे वितरण - परजणे


गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघ व बायफ संस्था
( नाशिक ) यांच्या संयुक्त सहकार्याने व एम. एस. डी. मेडिसीन कंपनीच्या माध्यमातून शिंगणापूर जिल्हा परिषद गटातील आदिवासी वाड्या -  वस्त्यांवरील शाळांसाठी वॉटर फिल्टर यंत्रांचे नुकतेच वाटप
करण्यात आलेत.

येथील  नामदेवराव परजणे सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे , पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे, शिक्षण विस्तार
अधिकारी सौ. शबाना शेख, शिंगणापूर गटाचे केंद्र प्रमुख राजेंद्र ढेपले, वारी गटाचे केंद्र प्रमुख किशोर निळे, संवत्सर जिल्हा परिषद शाळेचे
मुख्याधापक फव्याजखान पठाण, बायफ 
कार्यालयाचे विभागीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगळेकर, 
सचिन वाघमारे, सुपरवायझर
भालचंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मढी बु.,  कुंभारी, बढे वस्ती ( कुंभारी ), डाऊच बु., कोपरगांव ब्रॅंच, कोळपेवाडी मराठी व उर्दू शाळा, माहेगांव
देशमुख, संवत्सर, मनाई वस्ती, वाघीनाला,  दशरथवाडी, परजणे वस्ती, निरगुडे वस्ती, बिरोबा चौक,
चांदगव्हाण, जेऊरपाटोदा या शाळांना वॉटर फिल्टर यंत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेत.
प्रारंभी डॉ. जिगळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करुन फिल्टर वितरणाचा उद्देश विषद केला.

जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी उपक्रमासंदर्भात मार्गदर्शन करताना सांगितले की, सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दुषित पाण्याचे प्रमाण वाढते. परिणामी लहान मुलांना
आजाराची बाधा होते. अशा आजाराच्या
 विळख्यातून सुटका
 होण्याच्यादृष्टीने पिण्यासाठी शुध्द पाणी
मिळावे म्हणून गोदावरी दूध संघ व बायफ संस्थेने शाळांना वॉटर फिल्टर देण्याचा उपक्रम राबविला. लहान मुलांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्यातून सक्षम भावी पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने आपण शालेय
पातळीवर आजवर विविध उपक्रम राबविले आहेत. केवळ प्रसिध्दीसाठी नाही तर समाजाचे आपण
काहीतरी देणे लागतो या स्व. परजणे आण्णा यांच्या शिकवणीतून माझे काम सुरु असते.

कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे यांनी नाविन्याचा शोध घेवून त्याला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम राजेश परजणे हे नेहमीच करीत असतात. शैक्षणिक क्षेत्रात परजणे यांनी 
तालुक्यात जे उपक्रम राबविले ते जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरलेले आहेत. तर शिक्षण विस्तार अधिकारी
शयाना शेख यांनी तालुक्यात आजपर्यंत राबविण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती
दिली.

यावेळी मुख्याधापक सुभाष जगदाळे, मेंगाळ, शेख, दत्तात्रय काळे, अब्दूल मोहम्मद अमीन,
श्रीमती जाधव, मेहेरखांब, श्रीमती दैन, श्रीमती चव्हाण, फाटके, ए. एफ. कादरी, जगताप, सोळसे,
जे. के. सय्यद, सुनील जाधव, निकम यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते. मुख्याधापक फय्याजखान पठाण यांनी आभार व्यक्त केले. कोरोना काळातील मार्गदर्शक तत्वांचे पालन
करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

Comments

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

आजी, माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन

वाळू वाहतूक वाहनांचे सुधारित दर जाहीर