कोपरगाव प्रतिनिधी आषाढी एकादशीचे पर्वावर वारीसाठी आलेल्या वारकरी भक्तांना श्री क्षेत्र पंढरपूर शाखे व्दारा श्री गजानन महाराज मठामध्ये नवमी, दशमी, एकादशी व बारस या कालावधीत २ लाख ५० हजारावर भक्तांना श्री महाप्रसाद वितरीत करण्यात आला, तसेच वारी निमित्त आलेल्या ४९ दिंड्यांपैकी नियमाची पूर्तता केलेल्या ४६ भजनी दिंड्यांना भजनी साहित्यासह श्री संत वाङमयाचे वितरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी धर्मार्थ अॅलोपॅथीक फिरते रूग्णालयाचे माध्यमातून ३० हजार भाविकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत श्री संस्थेव्दारा शेगांव, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या तिर्थक्षेत्री आलेल्या आलेल्या २० हजार २० गावांना भजनी साहित्य व श्री संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले आहे. अशा रितीने श्री पंढरीनाथाचे व श्री कृपेने श्री संस्थानकडून वारकऱ्यांची सेवा घडून आली आहे. श्रींचे पालखीचे आषाढ शु. १५ रविवार दि. २१ जुलै, २०२४ रोजी सकाळी काला झाल्यावर श्री क्षेत्र पंढरपूर येथून शेगांव करीता प्रस्थान होईल, श्रींची पालखी करकंब, भगवान बार्शी, बीड, गे...
Comments
Post a Comment