आपेगावात २०१ कोरोना लसीकरण


कोरोना जागतिक महामारीत स्वतःच्या आरोग्याबरोबरच गावचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे लसीकरण महत्त्वाचे असून गावकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच मंगल ज्ञानेश्वर भुजाडे व उपसरपंच किसन सोपानराव गव्हाळे  यांनी केले. कोरोना प्रतिबंध शिबिरात 201 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
               गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोना महामारीचा संसर्ग वाढला आहे. त्यात  संजिवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व संजिवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सातत्याने गाव पातळीवर लक्ष केंद्रित करून कोरोना योद्ध्यासह  असंख्य नागरिकांना व निराधार व्यक्तींना आधार देण्याचे काम केले आहे.  भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी महिलांमध्ये याविषयी जागृती करून बचतगटांच्या भगिनींना सहकार्य केले असे उपसरपंच किसन गव्हाळे म्हणाले गावातील युवकांनी घरोघरी जाऊन लसीकरणासाठी रेजिस्ट्रेशनसाठी सहकार्य केले.या शिबीरात ग्रामसेवक,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, आपेगाव सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रेय पाटोळे, उपाध्यक्ष आसाराम सोमा पगारे, मंगलताई पाटोळे, शैलाबाई खिलारी, सर्व ग्रामपंचायत व  सोसायटीचे सदस्य आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद