सागर पंचारिया यांचे डाक विभाग टेबल टेनिस मध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड

श्री सागर पंचारिया यांचे राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेबदल त्यांचा सत्कार करताना पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव समवेत श्री संदीप कोकाटे,प्रकाश कदम,कमलेश मिरगणे,अनिल धनावत

अहमदनगर:
प्रधान डाकघर अहमदनगर मधील डाक सहायक श्री सागर शिवकुमार पंचारिया यांची डेक्कन जिमखाना पुणे येथे दि 25 ते 26 ऑगस्ट दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.

    राज्यस्तरीय डाक विभागीय  टेबल टेनिस स्पर्धा पुणे येथे संपन्न झाली.  महाराष्ट्रातील पंचेवीस स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता त्यामधून पुरुष गटात 5 तर महिला गटात 4 स्पर्धकांची जणांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.

 त्यामध्ये अहमदनगर पोस्टल विभागातून  श्री सागर पंचारिया,पुणे विभागातील श्री मधू लोणारे तर मुंबईतील श्री नरेंद्र चिपळूणकर,श्री गवास,श्री ठाकूर  तर श्री तेली यांची राष्ट्रीय पुरुष गटातून तर श्रीमती मालवणकर,श्री टिकम मुंबई तर श्रीमती सारिका नलावडे पुणे यांची महिला गटातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा कोलकत्ता येथे होणार असून वरील स्पर्धेत वरील  महाराष्ट्र राज्याचे वतीने हे सहभागी होणार आहेत.

श्री सागर पंचारिया यांचे निवडीबदल त्याचे पोस्टल संघटनेचे जेष्ठ नेते संतोष यादव,श्री संदीप कोकाटे,श्री प्रकाश कदम,श्री कमलेश मिरगणे, नामदेव डेंगळे,श्री राधाकृष्ण मोटे,श्री तान्हाजी सूर्यवंशी श्री रमित रोहिला,श्री नितिन थोरवे, श्री अनिल धनावत,श्री बापू तांबे,यांचे सह पोस्टल कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद