सेवानिवृती हा आयुष्यातील अनमोल योग - संतोष यादव........... श्री झेंडे यांचा सेवापूर्ती सोहळा

सेवानिवृत्ती निमित्त श्री झेंडे यांचा सत्कार करताना टपाल कर्मचारी संघटनेचे नेते श्री संतोष यादव,समवेत संदीप कोकाटे,श्री रावसाहेब चौधरी,श्री कमलेश मिरगणे,श्री शिवदासजी बनकर ,श्री श्रीकांत शिंदे सुबोधकुमार

अहमदनगर:

अहमदनगर डाक विभागातील व सध्या सबपोस्टमास्तर श्रीगोंदा येथे कार्यरत असणारे श्री चंद्रकांत  विठोबा झेंडे हे त्याच्या 39 वर्षीच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि 31 जानेवारी 2022 रोजी सेवानिवृत्त झाले.

श्री झेंडे यांनी डाक विभागात 39 वर्षे सेवा करत असताना पाथर्डी,बोधेगाव,जामखेड,बेलवडी ,

कोळगाव,विसापूर,अहमदनगर प्रधान डाकघर,श्रीगोंदा साखर कारखाना,काष्टी याठिकाणी काम केले.

त्याचे  सेवानिवृतीनिमित्त त्याना निरोप सभारभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव हे ह तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी सिनियर पोस्टमास्तर श्री संदीप कोकाटे,श्री शिवदासजी  बनकर डेप्युटी जनरल मॅनेजर सुदर्शन केमिकल्स पुणे हे होते.

यावेळी बोलताना टपाल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव म्हणाले की,सध्य परिस्थितीत संगणकीय प्रणाली मुळे कामकाजाची पध्दत मोठ्या जोमाने बदलत असून या परिस्थितीस सामोरे जाणे जुन्या कर्मचाऱ्यास हा नवीन बदल स्वीकारत कामकाज करणे मोठे जिकरीचे होत असून,या परिस्थितीमुळे अनेक कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग स्वीकारत आहेत परंतु अशा बदलत्या  परिस्थितीस सामोरे जात श्री झेंडे यांनी हा बदल स्वीकारत आपली सेवा पूर्ण केली ही निश्चित वाखाणण्याजोगी बाब असून,त्याच्या आयुष्यातील सेवानिवृत्ती हा मोठया योग्य आहे असे सांगत त्यानी झेंडे यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री दिलीप खरात, श्री रावसाहेब चौधरी,श्री संदीप कोकाटे,श्री शिवदासजी  बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री कमलेश मिरगणे तर आभार श्री श्रीकांत शिंदे यांनी केले.कार्यक्रमास परिसरातील  डाक कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद